Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लालवण शिवारात ५२ लाखांच्या गांजाची शेती उघड; पिशोर पोलिसांची धडक कारवाई, एकाला अटक

mosami kewat by mosami kewat
October 29, 2026
in बातमी
0
लालवण शिवारात ५२ लाखांच्या गांजाची शेती उघड; पिशोर पोलिसांची धडक कारवाई, एकाला अटक
       

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांच्या पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकाने   लालवण (ता. फुलंब्री) शिवारातील शेतात सुरू असलेल्या गांजाच्या बेकायदेशीर लागवडीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २८) करण्यात आली. यावेळी पोलिसांनी तब्बल ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये मूल्याचा गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एका ६६ वर्षीय शेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालवण येथील पाडळी एकफाटा परिसरातील शेत गट क्रमांक २८ मध्ये विनापरवाना गांजाची शेती फुलवली गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री पटवल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने संबंधित शेतात अचानक छापा टाकला.

या छाप्यादरम्यान चैनसिंग रतनसिंग बिमरोटे (वय ६६, रा. लालवण) याच्या शेतात कोणतीही कायदेशीर परवानगी किंवा परवाना नसताना केवळ आर्थिक फायद्यासाठी गांजाची व्यावसायिक प्रमाणावर लागवड केल्याचे उघडकीस आले. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या मोजणीत एकूण १४१ गांजाची झाडे आढळली, ज्यांचे एकूण वजन १०५.१५ किलो भरले. या जप्त केलेल्या मुद्द्यामालाची बाजारातील अंदाजित किंमत ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली असून, अवैध गांजा लागवडीच्या या जाळ्यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

आरोपी चैनसिंग बिमरोटे याच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करत आहेत.

 


       
Tags: crimeCrime newsFarmerMaharashtrapolice
Previous Post

भिंगे बदला, व्यवस्थेचे नॅरेटिव्ह उघडे पाडा!

Next Post

भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर

Next Post
भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर

भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न - भीमराव आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
बातमी

इथला आंबेडकरवादी लोकशाही रक्षासाठी लढत राहील – सुजात आंबेडकर

by Akash Shelar
October 29, 2026
0

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्ञानेश कुमार हटाव मार्च चे आयोजन करण्यात...

Read moreDetails
भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर

भाजपकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर

October 29, 2026
लालवण शिवारात ५२ लाखांच्या गांजाची शेती उघड; पिशोर पोलिसांची धडक कारवाई, एकाला अटक

लालवण शिवारात ५२ लाखांच्या गांजाची शेती उघड; पिशोर पोलिसांची धडक कारवाई, एकाला अटक

October 29, 2026
भिंगे बदला, व्यवस्थेचे नॅरेटिव्ह उघडे पाडा!

भिंगे बदला, व्यवस्थेचे नॅरेटिव्ह उघडे पाडा!

October 29, 2026
ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

ज्ञानेश कुमार हटाव मार्च आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

October 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home