ॲड. प्रकाश आंबेडकर : SIR मधून वगळलेली 13 कोटी जनता रस्त्यावर उतरली तर सरकारचे अवघड होईल.
मुंबई : निवडणूक काळात झालेल्या निवडणुकीतील गैर कारभाराच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथे ज्ञानेश कुमार हटाव मार्च आयोजित करण्यात आला होता या मार्चला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित करताना म्हटले की, राजकीय पक्ष जोपर्यंत आंदोलन चालवताय तोपर्यंत ते लोकशाही च्या चौकटीत राहील. ज्या 13 कोटी लोकांची नावे SIR मधून वगळले आहे ते रस्त्यावर उतरली तर इथल्या सरकारला अवघड होईल.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलनही पाहिले आणि इतर आंदोलने पाहत आहे. यावरून शासनाला एवढंच सांगतो की, लोकं हातातील काठी आता झेंड्यासाठी वापरत आहेत. उद्या ती तुमच्यावर वापरतील. ४६ हजार अग्नीवीर डिसेंबर मध्ये निवृत्त होणार आहेत त्यापैकी २५ हजारांना पुन्हा अर्ज केला असता, तर नोकरी मिळाली असती. पण एकानेही अर्ज केला नाही. त्या सगळ्यांनी चार वर्षाची आमची सेवा पूर्ण झाली, आम्ही आमच्या घरी जातो असे सांगितले. ज्यांना बंदुकीचे प्रशिक्षण आणि युद्धाचे प्रशिक्षण आहे. हा २४ते २५ वयातील तरुण बाहेर पडेल ज्याची युद्धाची मानसिकता असते. सामान्य माणसाचे हाल बघितल्यानंतर त्याला काय वाटेल ? शासनाचे आभार मानतो की, ही ४६ हजाराचे सैन्य तुम्ही आम्हाला डिसेंबर मध्ये देणार आहात. तुम्हाला आम्ही जाळल्या शिवाय राहणार नाही.
सध्या राज्यात आणि देशात दुष्काळ आहे. हा दुष्काळ जसाजसा वाढेल, तसे आम्हाला खायला घाला आणि पाणी द्या. असा इशारा जनतेने सत्ताधाऱ्यांना द्यायला पाहिजे. असा सल्लाही त्यांनी उपस्थित समुदायाला दिला.
देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावरही आंबेडकरांनी निशाणा साधला. काँग्रेस ही एकटी लढू शकत नाही असे यातून त्यांना सुचवायचे होते. ‘राहुल गांधी यांना आवाहन आहे की, त्यांनी इगो सोडावा. सर्व विरोधी पक्षांना एकत्र घ्यावे लागेल. राहुल गांधी एकटे मोदीशी लढू शकत नाही. आता मोदीचा आणि आरएसएसचा रस्ता मोकळा करण्यासाठी, यूपीमध्ये आम्ही एकटं जाऊ, म्हणून त्या ठिकाणी सांगत असल्याचे ॲड. आंबेडकरांनी म्हटले.
भाजपकडून फुले शाहू आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न – भीमराव आंबेडकर
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी देखील भाजप आणि आरएसएस यांच्यावर सडकून टीका केली. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा दाबण्याचा प्रयत्न भाजपा -आरएसएस सत्तेत आल्यापासून होत असल्याचे त्यांनी म्हटले. 2019 च्या निवडणुकीत आंबेडकरवादी जनतेने घोषणा केली की ईव्हीएम मे झोल है परंतु देशातील विरोधी पक्ष त्यावर सिरियस नव्हता 2024 मध्ये आपणच हा मुद्दा लावल्यावर त्यांना थोडी जाग आली. या देशातील परिस्थिती देखील बदलावी लागेल हजारोंच्या संख्येने चैत्यभूमी जवळ आणि जंतर-मंतरवर आपल्या हक्कासाठी जेन – झी मुलं एकत्र आली आणि राजीनामा झाला. दोन गुजराती हा देश चालवत आहेत आणि दोन गुजराती हा देश विकत असल्याचे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी माजी आमदार कपिल पाटील यांनी देखील निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचा कारभार यावर जोरदार प्रहार केला. भारताचा निवडणूक आयोग ही आरएसएस ची शाखा बनला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशावर आणि लोकशाहीवर जेव्हा संकट आला आहे तेव्हा तेव्हा आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरली आहे. असेही पाटील यांनी म्हटले.
इथला आंबेडकरवादी लोकशाही रक्षासाठी लढत राहील – सुजात आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यावर उपहासात्मक करत म्हटले की, भाजपचे तीन स्टार प्रचारक आहेत सीबीआय, ईडी आणि ज्ञानेश कुमार. तसेच लोकशाही रक्षणासाठी इथला आंबेडकरवादी हा कायम लढत राहील असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले.

मतदान हा आमचा संविधानिक अधिकार आहे – राजेंद्र पातोडे
बाळासाहेब आंबेडकर यांनी देशात पहिल्यांदा ईव्हीएम दहन केले 76 लाख मतवाढी विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयात लढा दिला. तसेच मतदान हा आमचा संविधानिक अधिकार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी मांडले. SIR विरोधातील न्यायालयीन लढा बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत आगामी काळात या लढ्यात आपण सर्वांनी सहभाग व्हावे असे आवाहनही पातोडे यांनी केले.






