नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने SC, ST, OBC समूहातील Gen Z तरुणांशी संवाद साधणारा विशेष उपक्रम ‘जय भीम Gen Z’ टाऊनहॉल कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. 31 रोजी दुपारी 3 वाजता शंकरराव सभागृह, नांदेड येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे बहुजन तरुणांशी थेट संवाद साधणार आहेत.
बहुजन तरुणांच्या प्रश्नांना, शैक्षणिक संधी, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांना वाचा फोडणारा हा एक अतिशय महत्त्वाचा सामाजिक उपक्रम आहे. अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांचे हक्क यावर या कार्यक्रमात महत्त्वाची चर्चा होणार आहे.
यापूर्वी हा कार्यक्रम औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे संपन्न झाला होता, ज्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. नांदेडमध्येही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी फारुख अहमद, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत इंगोले, अक्षय बनसोडे, कैलास वाघमारे, नगरसेवक बिलाल शेख,शंकर महाजन, प्रा अटकोरे,रवी पंडित यांच्या सह अनेक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते




