अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्यदिन गो.से. महाविद्यालयात उत्साहात संपन्न
स्थानिक-भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण व्हावे व येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची जाणीव या निमित्ताने व्हावी या उद्देशाने आपण स्वतंत्रता दिवसमोठया उत्साहाने साजरा करत असतो. आज संपूर्ण देश अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिन साजरा करत असून महाविद्यालयात आजच्या या पावन प्रसंगी स्वातंत्रसंग्राम सैनानी मा.श्रीमती मधुराबाई बबन पाटील, खामगाव, मा.श्रीमती राजसाबाई रामचंद्र धनोकार, मांडका, मा.श्रीमती शांताबाई लक्ष्मीचंद जैन, राहुड, मा.श्रीमती अनुसयाबाई संभाजी गवळी, हिवरखेड तसेच दलित मित्र पुरस्कार मिळालेल्या मा. श्रीमती सीताबाई शंकर वानखडे खामगाव यांच्या कार्याबद्दल त्यांचे स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते कर्तव्यसन्मान करण्यात आला.
विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित गो .से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन विशीप्रमचे संचालक मा.अशोक सोनोने यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करून साजरा करण्यात आला.
प्रथम मातृतीर्थ जिल्ह्यातील सुपुत्र कैलास भारत पवार यांना वीर मरण आले तसेच शेगाव संस्थानचे विश्वस्त तथा व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ यांचे देखील दीर्घ आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झाले त्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीचे देशाच्या इतिहासात महत्व अनन्य साधारण असून त्यांच्या कुटुंबाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे मत आजच्या कार्यक्रमाचे आध्यक्ष विशीप्रमचे आध्यक्ष मा.डॉ. सुभाष बोबडे यांनी व्यक्त केले. आपल्यासारख्या स्वातंत्र्यसंग्राम सैनानीमुळे हा दिवस पाहण्याचे भाग्य आजच्या पिढीला लाभले असून त्यांचा सन्मान करतांना आम्हाला अत्यानंद होत असल्याचे मत त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.
यावेळी मंचावर विशीप्रमचे उपाध्यक्ष अशोकजी झुनझुनवाला व प्राचार्य डॉ. डी. एस. तळवळकर उपस्थित होते. यावेळी श्री.सागर वाढोकार याचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेल्या विविध स्पर्धकांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो, कार्यक्रम अधिकारी डॉ. हनुमंत भोसले यांनी तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तळवनकर यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला विशीप्रमचे सचिव, डॉ. प्रशांत बोबडे, संचालक अजिंक्य बोबडे, प्रकाश तांबट, राजेंद्र झांबड, सो.श्रद्धाताई बोबडे, ऍड.अनिल व्यास, विजय निलंगे, रोशन जैन, शाळीग्राम बोदडे, आलेल्या स्वातंत्र्य सेनानी यांचे कुटुंबीय, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी कोविड नियमाचे पालन करत अथक परिश्रम घेतले.