Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
August 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
       
पुणे : भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त पुण्यात भटके-विमुक्त राज्यस्तरीय परिषद २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती आहे.  यावेळी भटक्या-विमुक्त समाजबांधवांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांना संविधानाच्या प्रस्तावनेची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.

पुण्यातील सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक सभागृहापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भटके-विमुक्त समाजातील पारंपरिक लोककलावंतांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. पारंपरिक वाद्ये, नृत्य आणि संगीताच्या सादरीकरणामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली.

यानंतर साने गुरुजी स्मारक सभागृहात राज्यस्तरीय परिषदेची सुरुवात झाली. भटके-विमुक्त समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून समाजबांधव मोठ्या संख्येने परिषदेसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने परिषदस्थळी गर्दीचे चित्र पाहायला मिळत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: MaharashtraPoliticalpunePune Bhatke-Vimukt State-Level ConferenceVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

Next Post

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home