Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

mosami kewat by mosami kewat
August 31, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के
       

कळंब : वंचित बहुजन आघाडीच्या कळंब तालुका पक्ष संघटनेची मासिक आढावा बैठक कळंब येथील तथागत बुद्ध विहार येथे उत्साहात पार पडली. बैठकीत तालुक्यातील पक्ष संघटनेची बांधणी, पक्षाची ताकद आणि आगामी संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीमध्ये बूथ बांधणी, ‘गाव तिथे शाखा’, शहर कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, SIR नोंदणीचा आढावा, पदाधिकारी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच पक्षाच्या वतीने देण्यात आलेली निवेदने आणि करण्यात आलेली आंदोलने आदी विषयांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांनी मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ही वंचित, शोषित, पीडित आणि बहुजन समाजाच्या न्याय-हक्कांसाठी लढणारी संघटना असल्याचे सांगितले. कळंब तालुक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे आणि कुंदन कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कळंब तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करून वंचित बहुजन आघाडीचा विचार बहुजन समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, एम. व्ही. शिंदे, तालुका महासचिव कुंदन कांबळे, बाबासाहेब टोपे, रतन सावंत, लहु हिंगे, कृष्णा खुणे, रोहित सूर्यवंशी, धम्मपाल बचुटे, अविनाश भालेराव, प्रज्ञेश टोपे, अर्थव सावंत, रवी टोपे, अलोक वाघमारे, आर्यन सावंत, शौर्य टोपे, आर्यन वाघमारे, रोशन कांबळे, आदित्य कांबळे, आवी शिंदे, आकाश शिनगारे, प्रबुद्ध टोपे, दीपक टोपे, बाळासाहेब वाघमारे, दिनेश वाघमारे, अजय आवाड, सागर कांबळे, आरूषी घोडके, शुभदा घोडके, स्वहिता हौसलमल, आरोही घोडके, शिला घाडगे, लिलावती समुद्रे, सुशिला गजधने, शांता टोपे, छाया ओव्हाळ आणि नागरबाई वाघमारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाबासाहेब टोपे यांनी केले.


       
Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadiकळंब
Previous Post

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

Next Post

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Next Post
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात'भटके-विमुक्त दिन' भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home