मालेगाव – भारतीय बौद्घ महासभा नाशिक पूर्व अंतर्गत मालेगाव शहर व तालुका कार्यकारणीची मुदत पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारण्या गठीत करून जाहीर करण्यात आल्या आहेत.
भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यू जी बोराडे यांच्या आदेशान्वये व पालकमंत्री आणिकराव गांगुर्डे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष गौरव पवार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रथम तथागत भगवान बुध्द यांना जिल्हाध्यक्ष गौरव पवार यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.
सर्व प्रथम कार्यकाळ पूर्ण झाल्याने शाखा बरखास्त करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष गौरव पवार यांनी जाहिर केले. , मातृसंस्थेसोबत सर्वांनी एकनिष्ठ राहिले पाहिजे. समाजात आम्हाला व्यक्तिगत कोणीही स्वीकारत नाही मात्र, संस्थेमुळे आज आम्हाला लोक गुरुजी म्हणून संबोधित करतात व आदरभाव करतात. संस्थेने आम्हाला दिलेले २४ प्रकारच्या शिबिरांची सर्वांनी अंमलबजावणी केली पाहिजे व केंद्रीय व राज्य शाखेमार्फत येणाऱ्या आदेशाचे सर्वांनी अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे. संस्थेने दिलेले उद्देशाला आम्ही प्राधान्य दिले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे आम्हाला प्रतिनिधित्व करायला मिळते हे आमचे पुण्यकर्म समजले पाहिजे. समाजाला दिशा हीन होऊ नये यासाठी आम्ही महिला शिबिर, श्रामनेर शिबीर, व्यसनमुक्ति, अंधश्रध्दा,लहान मुलांचे संस्कार शिबिर, व समाजाच्या रक्षणार्थ स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे शिबिरांचे जास्तीत जास्त आयोजन झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
धम्मयान सदस्य मोहिम राबविणे,
राष्ट्रीय कुटुंब नोंदणी यशस्वी करणे, वार्षिक सदस्य मोहिम राबविणे, श्रामनेर शिबिर, महिला शिबिर,
प्रचार व पर्यटनाचे आयोजन करने आदी सूचना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मालेगाव तालुका व शहर शाखा खालीलप्रमाणे जाहिर करण्यात आली –
मालेगाव तालुका शाखा खालील प्रमाणे
अध्यक्ष : रवींद्र बळीराम निकम (मालेगाव), सरचिटणीस : शंकर खरे (दाभाड़ी), कोषाध्यक्ष : भालेराव (येसगाव), उपाध्यक्ष महिला – शांताबाई भालेराव, सचिव महिला – उज्वला मगरे, सचिव महिला – पौर्णिमा अहिरे, उपाध्यक्ष संस्कार – अरविंद धिवरे, सचिव संस्कार प्रकाश अहिरे, सचिव संस्कार आरती कदम, उपाध्यक्ष संरक्षण गौतम अहिरे तळवाडे, उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन सखाराम मैराळे,
सचिव सरंक्षण सुनील अहिरे,
सचिव संरक्षण संजय बागुल, हिशोब तपासणी प्रमुख संजय बागुल, कार्यालयीन सचिव मिलिंद आहिरेसंघटक भूषण पवार,सुशील पवार,प्रकाश आहिरे,
मालेगाव शहर शाखा खालील प्रमाणे
अध्यक्ष : मंगेश फकीरा निकम, सरचिटणीस: नितिन दादाजी आहिरे, कोषाध्यक्ष : दादाजी काशिनाथ वाघ,
उपाध्यक्ष संस्कार आनंद मैराळे, सचिव संस्कार वाल्मीक देवरे, सचिव संस्कार अशोक धिवरे, उपाध्यक्ष महिला नलिनीताई गायकवाड,
सचिव महिला – संगीता अहिरे,
सचिव महिला – उज्वला पगारे, उपाध्यक्ष संरक्षण – नितीन बागुल, सचिव संरक्षण – अनिल महिरे
सचिव संरक्षण – शिवा निकम
उपाध्यक्ष प्रचार व पर्यटन- रमेश सरदार, सचिव प्रचार व पर्यटन – गौरव थोरात, सचिव प्रचार व पर्यटन – दीपक यशोद, हिशोब तपासणी प्रमुख – हिरामण वाघ, संघटक – विशाल जगताप,कमल धिवरे, आदींची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गांगुर्डे यांनी केले व आभार जयवंत निकम यांनी मानले.