Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा

mosami kewat by mosami kewat
August 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
स्पीड ब्रेकरचे धोकादायक खिळे हटवा, अन्यथा पालिका पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा मनमाड नगरपालिकेला इशारा
       
मनमाड : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय काळात बसविण्यात आलेले रबरी व फायबरचे स्पीड ब्रेकर अवघ्या काही महिन्यांतच उखडून गायब झाले आहेत. मात्र, हे स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी वापरण्यात आलेले तीक्ष्ण लोखंडी खिळे आणि बोल्ट सध्या रस्त्यावर उघडे पडले असून, त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर समस्येची तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने रस्त्यावर उघडे पडलेले धोकादायक खिळे व बोल्ट त्वरित हटवावेत आणि त्याठिकाणी दर्जेदार नवीन स्पीड ब्रेकर बसवावेत. अन्यथा मनमाड नगरपालिकेच्या पायरीवर ‘खिळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास आहीरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रस्त्यावर उघडे पडलेले लोखंडी खिळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांच्या सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे वाहने घसरून किंवा खिळ्यांवर आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर होण्याबरोबरच फाटण्याच्या घटनांमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पाणी साचणे तसेच रात्रीच्या वेळी अंधार असणे यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत पादचाऱ्यांचा पाय उघड्या खिळ्यांवर पडून गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून उघडे पडलेले सर्व खिळे व बोल्ट तात्काळ काढावेत आणि संबंधित ठिकाणी चांगल्या दर्जाचे नवीन स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, अमोल केदारे, अशपाक शाह, खुशाल थोरात, रूपेश जाधव, सागर गाडे, सुनील बागुल यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: MaharashtraManmadPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मांडेगाव येथे ‘जय भीम बुद्ध विहारा’चे छत कोसळले; सुदैवाने बालके बचावली! ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे बौद्ध समाजात तीव्र संताप, १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा.

Next Post

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

Next Post
कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home