Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पिंपरी: एसआरए प्रकल्पाला स्थगिती व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाईच्या मागणीसाठी शारदा बनसोडे उपोषणावर

mosami kewat by mosami kewat
August 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पिंपरी: एसआरए प्रकल्पाला स्थगिती व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाईच्या मागणीसाठी शारदा बनसोडे उपोषणावर

पिंपरी: एसआरए प्रकल्पाला स्थगिती व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाईच्या मागणीसाठी शारदा बनसोडे उपोषणावर

       

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दत्तनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा (एसआरए) प्रकल्प, कथित वृक्षतोड आणि संबंधित विभागांच्या कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा शारदा राजू बनसोडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. विविध आठ मागण्यांसाठी शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता भीमसृष्टी स्मारक, पिंपरी येथे हे उपोषण सुरू करण्यात आले.

दत्तनगर येथील सिटी सर्व्हे क्रमांक ५२३२ तसेच गट क्रमांक १२१ व ११९ या मिळकतींबाबत पिंपरी न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक ६१७/२०२६ न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित एसआरए प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी प्रमुख मागणी बनसोडे यांनी केली आहे.

Also Read : खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली संबंधित विकासकाकडून बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित विकासक आणि जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून विकासकाला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस देण्यात आल्यानंतरही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दत्तनगर एसआरए प्रकल्पासाठी राज्य शासनाची मंजुरी कशा पद्धतीने घेण्यात आली, नागरिकांच्या हरकतींची दखल घेण्यात आली का, याबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच जमिनीच्या मोजणी, पुनर्वसनासंदर्भातील अहवाल आणि अभिप्राय तयार करताना नागरिकांना नोटीस किंवा हरकतीची संधी देण्यात आली नसल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दत्तनगर येथील झोपड्या हटविण्यासाठी १० ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्त देण्यात येऊ नये, अशी मागणीही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगासमोर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने एसआरए प्रकल्पाला स्थगिती देऊन संबंधित प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Also Read : शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम १५४ तसेच कलम ३७ (१) अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतही बनसोडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी एसआरए प्रकल्पाला विरोध करून हरकत नोंदविल्यानंतरही आपल्याला सुनावणीसाठी बोलावण्यात आले नसल्याचा त्यांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या मंजुरीची प्रक्रिया, नागरिकांच्या हरकती आणि सुनावणीबाबत खुलासा करून संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


       
Tags: MaharashtraPimparipimpari chinchwadSharada Bansode Begins Hunger StrikesraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

Next Post

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

Next Post
मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
बातमी

ज्येष्ठ चित्रकार अन् कवी श्रीधर अंभोरे यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

by mosami kewat
August 10, 2026
0

मुंबई: आपल्या आगळ्यावेगळ्या चित्रशैलीने कला व साहित्य विश्वावर विशेष ठसा उमटवणारे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकार आणि कवी श्रीधर अंभोरे यांचे...

Read moreDetails
मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

मुंबईची बेस्ट (BEST) becoming worst ! 

August 10, 2026
पिंपरी: एसआरए प्रकल्पाला स्थगिती व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाईच्या मागणीसाठी शारदा बनसोडे उपोषणावर

पिंपरी: एसआरए प्रकल्पाला स्थगिती व बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाईच्या मागणीसाठी शारदा बनसोडे उपोषणावर

August 10, 2026
खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

खुलताबाद रस्त्यावरील धोकादायक दुभाजकाचा वंचित बहुजन आघाडीने केला प्रतीकात्मक ‘अंत्यविधी’

August 10, 2026
शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home