Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
August 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी
       
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांचे जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मनमाड : मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग मनमाड नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहराध्यक्ष विलास अशोक आहिरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी नाशिक तसेच मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या मनमाड उपजिल्हा रुग्णालयामार्फत विवाह नोंदणीचे कामकाज पाहिले जात आहे. मात्र, रुग्णालयात रुग्णसेवा, आपत्कालीन वैद्यकीय उपचार आणि प्रशासकीय कामांचा मोठा ताण असल्याने विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ मधील तरतुदींनुसार शहरी भागातील विवाह नोंदणीचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असणे अधिक सोयीचे आणि प्रशासकीयदृष्ट्या सुलभ ठरते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे की, उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग पूर्णपणे मनमाड नगर परिषदेच्या प्रशासकीय कक्षेत वर्ग करण्यात यावा. तसेच नगरपालिकेत स्वतंत्र विवाह नोंदणी अधिकारी आणि स्वतंत्र कक्ष सुरू करून नागरिकांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून द्यावे.

नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून हा विभाग तातडीने मनमाड नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विलास आहिरे यांनी केली आहे.

Tags: MaharashtraManmadVanchit Bahujan Aaghadiमनमाड
Previous Post

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना

Next Post

वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा

Next Post
वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट ‘मंडल विजय दिवस’ सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा

वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्यात ७ ऑगस्ट 'मंडल विजय दिवस' सामाजिक न्याय व समता दिन म्हणून साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home