Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना

mosami kewat by mosami kewat
August 7, 2026
in Uncategorized
0
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना
       
मुंबई : वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दर्जेदार जेवण व इतर मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश अशोक दोडके यांनी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आकाश दोडके यांनी थेट वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात जाऊन विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेची पाहणी केली. तसेच जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तपासणी करून संबंधित ठेकेदाराला विद्यार्थ्यांना सकस, पौष्टिक, दर्जेदार आणि पोटभर जेवण देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

यानंतर त्यांनी वसतिगृहाचे अधीक्षक यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आकाश दोडके म्हणाले की, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात कोणत्याही प्रकारच्या गैरसोयी सहन कराव्या लागू नयेत. त्यांच्या राहण्यापासून ते जेवणापर्यंत प्रत्येक सुविधेचा दर्जा कायम राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांबाबत कोणतीही हयगय वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य लढ्यात वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.” या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनीही आपल्या विविध अडचणी मांडल्या असून त्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.

Previous Post

शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक

Next Post

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

Next Post
मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी
बातमी

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी

by mosami kewat
August 7, 2026
0

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांचे जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन मनमाड : मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभाग मनमाड...

Read moreDetails
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना

August 7, 2026
शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक

शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक

August 7, 2026
नाशिक : पूरग्रस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनाचा इशारा

नाशिक : पूरग्रस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनाचा इशारा

August 7, 2026
बहुजन समाज पार्टीचे रमेश संभाजी वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

बहुजन समाज पार्टीचे रमेश संभाजी वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home