Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

mosami kewat by mosami kewat
July 15, 2026
in Uncategorized
0
राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित
       
मुंबई : राज्यात अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवरही कठोर पावले उचलली आहेत. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नियमभंग करणाऱ्या ३८ संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ३४ रक्तपेढ्या व रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, चार संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत एफडीएने राज्यभरातील रक्तपेढ्यांची सखोल तपासणी केली. त्यावेळी अनेक केंद्रांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

सध्या महाराष्ट्रात ४१३ परवानाधारक रक्तपेढ्या आणि ४६८ रक्त साठवणूक केंद्रे कार्यरत आहेत. तपासणीदरम्यान २१ रक्तपेढ्या आणि १३ रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. तसेच दोन रक्तपेढ्या आणि दोन रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. यावेळी एफडीएच्या तपासणी दरम्यान परवान्याच्या अटींचे उल्लंघन, गुणवत्ता व्यवस्थापनातील त्रुटी, नोंदींमधील विसंगती, रक्त साठवणुकीसाठी आवश्यक तापमान नियंत्रणाचा अभाव, रक्त तपासणीतील नियमांचे पालन न करणे तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी आढळून आल्या. अशा अनेक त्रुटी हे तपासणी दरम्यान आढळून आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, सांगली, सातारा, अमरावती, वाशिम आदी जिल्ह्यांतील अनेक रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी पुण्यातील बोरी परढी येथील पाटील हॉस्पिटल रक्त साठवणूक केंद्र आणि भिवंडीतील आधार रक्त साठवणूक केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. तक्रारीनंतर झालेल्या तपासणीत माया ब्लड सेंटर आणि सर जे. जे. महानगर ब्लड सेंटरवरही कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, रक्त हे केवळ औषध नसून जीवन वाचवणारे साधन आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रक्त पुरवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही रक्त केंद्राला किंवा रक्त साठवणूक केंद्राला सोडले जाणार नाही. भविष्यातही नियमित आणि अचानक तपासण्या सुरू ठेवून सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित केले जाईल.

Tags: fdaMaharashtraMaharashtra FDAMaharashtra FDA ActionTukaram Mundhe
Previous Post

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

Next Post

स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक; युवा आघाडीच्या जिल्हा महासचिवांचा आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home