Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

mosami kewat by mosami kewat
July 15, 2026
in Uncategorized
0
ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

ठाण्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल खाडीत वाहून गेला; वंचित बहुजन आघाडीचे सरकारला सवाल

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात बांधकामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर टीका करत या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे काय सुरू आहे? मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे येथे बांधण्यात येत असलेला हा पूलही वाहून गेला. राज्यात, केंद्रात आणि ठाण्यात भाजपची सत्ता आहे. असा सवाल करण्यात आला आहे. (Thane Bridge Collapse)

Also Read : हिप्परगा थडीत वंचित बहुजन आघाडीचा वाढता जनाधार! 

तसेच, आता यावर काही बोलले तर नागरिक महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, असे म्हणणार का? पण तुमच्या सरकारने दिलेल्या कंत्राटांमुळे पूल कोसळतात, रस्त्यांवर खड्डे पडतात, दरडी कोसळतात; त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे.

खाडीवरील मुख्य पूल उभारण्याचे काम सुरू असल्याने यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य तसेच कामगार आणि अधिकाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी स्वतंत्र तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. सुदैवाने घटना घडली त्यावेळी पुलावर कोणतेही कर्मचारी किंवा वाहने नसल्याने मोठी जीवितहानी टळली. (Thane Bridge Collapse)

Tags: bjpBullet Train ConstructionDevendra FadanvisMaharashtraTemporary Bridge Washed AwayThaneThane Bridge Collapse
Previous Post

२७०० मिलिनिअर्स रोज, मग गरिबांच्या वाट्याला काय?

Next Post

राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

Next Post
राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

राज्यात रक्तपेढ्यांवर एफडीएचा मोठा धडाका; ३८ संस्थांवर कारवाई, ३४ परवाने निलंबित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home