Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी
       
तिवसा : शेतीच्या पेरणीचा हंगाम आटोपला असताना शेतकऱ्यांनी विविध कंपनीचे पेरलेले बियाणे काही ठिकाणी उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या असून निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे.

पेरणीनंतर काही शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वंचित बहुजन आघाडीकडे प्राप्त झाल्या होत्या, शेतकरी कायम अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला असताना बियाणे कंपनीने निकृष्ट बियाणे देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. सदर प्रकारामुळे अल्पभूधारक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे. सदर बाबीची दखल घेत नीकृष्ठ बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुक्याच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.

निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, राहूल पखाले, दिनेश कांबळे, अमर कांबळे, अभिषेक मनोहरे, प्रतीक कठाने सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नाही त्याकरिता कृषी सेवा केंद्र जबाबदार असून पूर्णपेरणी करिता कृषी सेवा केंद्राने बियाणे उपलब्ध करून द्यावे व संबंधित कंपनी विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करावा, आमच्या निवेदनाची दखल घेत यासंदर्भात तहसीलदार यांचेकडे 14 जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. बैठकीत शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्र विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी दिली आहे.

Tags: AgricultureamravatiFarmerMaharashtraPoliticalTiwasa
Previous Post

पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
July 8, 2026
0

तिवसा : शेतीच्या पेरणीचा हंगाम आटोपला असताना शेतकऱ्यांनी विविध कंपनीचे पेरलेले बियाणे काही ठिकाणी उगवलेच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या असून...

Read moreDetails
पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू

पुण्यातील मोशी परिसरात भीषण दुर्घटना! मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला; ५ कामगारांचा जागीच मृत्यू

July 8, 2026
चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!

चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!

July 8, 2026
प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!

प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!

July 8, 2026
मालेगाव: कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा प्रशासनाला दिले निवेदन

मालेगाव: कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा प्रशासनाला दिले निवेदन

July 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home