Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

mosami kewat by mosami kewat
June 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; राज्यभरात ३१ छापे, १९ जणांना अटक!

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी विशेष मोहीम राबवली आहे. मुंबईतील अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ प्रसिद्ध उपाहारगृहे, हॉटेल्स, बेकरी आणि क्लब्सचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्यभरात ३१ ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Also Read : भटके-विमुक्तांच्या घरगणना-जनगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा समारोह’ उत्साहात; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

तपासणी मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर अनियमितता उघडकीस आल्या. अस्वच्छ वातावरण, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा, चुकीची माहिती असलेले लेबल, झुरळे व उंदरांचा वावर, शीतसाखळीचे नियम न पाळणे तसेच आवश्यक परवाने व कागदपत्रांचा अभाव अशा अनेक त्रुटी आढळल्याने संबंधित सहा आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले.

नरीमन पॉइंट येथील फ्लिंट अँड वार्सा या उपाहारगृहात चुकीच्या माहितीचे लेबल लावलेले अन्नपदार्थ आढळून आले. तसेच तपासणीत सापडलेले मुदतबाह्य अन्नपदार्थ तत्काळ नष्ट करण्यात आले. बोरिवलीतील एका बेकरीत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले.

Also Read : एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणे ही गंभीर घटनात्मक चिंता; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

याशिवाय भांडुप, सांताक्रूझ, अंधेरी आणि वांद्रे येथील काही आस्थापनांमध्ये स्वच्छतेचा अभाव, कीटक नियंत्रणातील निष्काळजीपणा, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच ग्राहक तक्रार निवारण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Tags: fdaFood and Drug Administration MaharashtraFood SafetyMaharashtraMaharashtra FDAmumbaiMumbai Food SafetyTukaram Mundhe
Previous Post

भटके-विमुक्तांच्या घरगणना-जनगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा समारोह’ उत्साहात; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचा अक्कलकोट नगरपरिषदेला अर्धनग्न आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के
बातमी

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

by mosami kewat
August 31, 2026
0

कळंब : वंचित बहुजन आघाडीच्या कळंब तालुका पक्ष संघटनेची मासिक आढावा बैठक कळंब येथील तथागत बुद्ध विहार येथे उत्साहात पार...

Read moreDetails
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home