अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवस दरवर्षी स्वाभिमानी दिवस म्हणुन साजरा केला जातो. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या भिषण परिस्थितीमुळे हा दिवस जल्लोष न साजरा करता सामाजिक बांधिलकी जोपासत वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते प्रसिद्ध व्यापारी मनोहर पंजवाणी यांनी रुग्णांच्या करमणुकीकरिता जिल्हा परिषद कोव्हिड केअर सेंटरला एलईडी टिव्हीची भेट देऊन अनोखं पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला. याआधी सुद्धा मनोहर पंजवाणी यांनी जिल्हा परिषद कोव्हिड सेंटरला तीन एसी सुद्धा भेट दिल्या आहेत. सोमवारी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते मनोहर पंजवाणी यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जि.प.उपाध्यक्षा सौ. सावित्रीबाई राठोड, आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, वंचितचे हिरासिंग राठोड,निलेश उन्हाळे, जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी प्रकाश गवळी,डाॅ.आंधळे, संदिप पंजवाणी, जय हेमनानी, विनोद आलिमचंदानी, अमित तोलानी, गौरव तोलानी, रितेश लालवाणी,संदिप पंजवाणी, विक्की धनवानी यांच्यासह कोव्हिड सेंटरमधील डाॅक्टर नर्सेस कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.
जि.प.उपाध्यक्षांकडुन २०० चादरचे मोफत वाटप
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या कोव्हिड केअर सेंटरला सोमवारी २०० चादरचे मोफत वाटप जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. सावित्रीबाई राठोड व हिरासिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यापारी नेते मनोहर पंजवाणी, प्रकाश गवळी, अमरदीप वानखडे,संदिप पंजवाणी यांच्यासह पदाधिकारी व सेंटरमधील कर्मचारी उपस्थित होते.