जालना – शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद व हिंदू चे सन शासकीय नियमानुसार साजरे करण्यात यावेत या अनुषंगाने आशा सभागृह कदीम पोलिस स्टेशन येथे डी.वाय.एस.पी सुधिर खिरडकर, कदीम पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह नगरसेवक व शांतता समितीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी बोलतांना सांगितले की, यावर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती शासकीय नियमानुसार साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे रमजान ईद व हिंदू चे सन देखील शासकीय नियमानुसार साजरे केले जातील परंतु जालना शहरात कोरोना लसिकरनासाठी आरोग्य विभाग च्या गलथान कारभारामुळे आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यत हजारो संख्येने लोक लसिकरन केंद्रावर जमा होत आहेत.एकाच इसमाला दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या डोस दिल्या जात आहेत ही बाब गंभीर असुन याप्रकरणी आरोग्य मंत्री यांनी जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे गांभीर्याने लक्ष घाला अशी विनंती करण्यात आली.
ReplyReply to allForward |