Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; माण-खटावमधील मुस्लिम व बहुजन समाजाची तहसीलदारांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
May 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; माण-खटावमधील मुस्लिम व बहुजन समाजाची तहसीलदारांकडे मागणी
       
गायीला भारताचा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित  करा: इम्तियाज नदाफ 

सातारा : गायीला भारताचा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी माण आणि खटाव तालुक्यातील मुस्लिम व बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीव्यवस्थेमध्ये गायीचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. गायीला केवळ प्राणी न मानता ‘माता’ म्हणून आदर दिला जातो. तिचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दूध, गोमूत्र आणि शेण यांचा शेती तसेच मानवी आरोग्यासाठी उपयोग होत असून, गोपालनामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होत असल्याचेही नमूद करण्यात आले.

गाय ही शांतता आणि अहिंसेचे प्रतीक असल्याचे सांगत गोवंश संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा दिल्यास तिच्या संरक्षणाला अधिक कायदेशीर बळ मिळेल आणि गोहत्येसारख्या प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडे योग्य कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, वंचित बहुजन आघाडीचे नेते इम्तियाज नदाफ, वंचितचे नगरसेवक तुषार बैले, इम्रान बागवान, सत्यवान कमाने,  इम्तियाज बागवान, सादिक मुल्ला, आमीन आगा, दाऊदखान मुल्ला, आमीन मुल्ला, सज्जाद शेख, सलीम काझी, इम्रान सर्फराज पठाण, दस्तगीर मुल्ला, सर्फराज बागवान, सोहिल मुल्ला आदींसह मुस्लिम व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देत सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच इम्तियाज नदाफ यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

Tags: AnimalCowCow animalMaharashtraSataraVanchit Bahujan Aghadi
Previous Post

ए आय मधील महागुंतवणूक: कॉर्पोरेट भांडवलशाहीचा आत्मघातकी प्रवास?

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश
बातमी

जंतर-मंतर ते महाराष्ट्र बंद…धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाला मोठे यश

by mosami kewat
July 25, 2026
0

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र...

Read moreDetails
विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करावे; प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघात उभारा ‘सब-सेंटर’ : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली

July 25, 2026
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध! उमरखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य रॅली; बाजारपेठ कडकडीत बंद

July 24, 2026
येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

येवल्यात मंत्री छगन भुजबळांना वंचित बहुजन युवा आघाडीकडून काळे झेंडे; सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध

July 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home