Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

mosami kewat by mosami kewat
March 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने
       
पिंपरी चिंचवड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात तीव्र निदर्शने करण्यात आली. २ मार्च रोजी मुंबई येथे “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

या आंदोलनादरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न उपस्थित केले होते. या संदर्भात अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान अमर साबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: bjpEpstein fileMaharashtranarendra modipimpari chinchwadPimpari Chinchwad protestpunePune NewsVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

Next Post

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

Next Post
मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इंस्टाग्राम डाऊन! फीड आणि मेसेजिंगमध्ये अडचणी; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस
बातमी

इंस्टाग्राम डाऊन! फीड आणि मेसेजिंगमध्ये अडचणी; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

by mosami kewat
March 11, 2026
0

जगातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अचानक तांत्रिक अडचणींमुळे अनेक ठिकाणी डाउन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतासह जगातील विविध...

Read moreDetails
पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

पेट्रोलियम क्षेत्रात ESMA लागू; केंद्र सरकारच्या धोरणावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका!

March 11, 2026
प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित

प्रस्तावित रिंग रोडचा वाद: ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्वासनानंतर नाशिकमधील महिलांचा लढा तूर्तास स्थगित

March 11, 2026
RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश

RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश

March 11, 2026
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी! ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

March 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home