Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महिलांनी हक्कांसाठी संघटित व्हावे: सातपूर येथील मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन

mosami kewat by mosami kewat
March 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महिलांनी हक्कांसाठी संघटित व्हावे: सातपूर येथील मेळाव्यात प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे आवाहन
       

नाशिक: “जेव्हा एखादी महिला संघर्षासाठी बाहेर पडते, तेव्हा ती अनेक पातळ्यांवर लढा देत असते. हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नसून समाजाच्या हक्कांसाठी असतो. अशा लढवय्या महिलांचा सत्कार होणे गरजेचे आहे,” असे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील सातपूर भागातील सौभाग्य लॉन्स येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने भव्य मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता त्र्यंबक रोडवरील सौभाग्य लॉन्स येथे हा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

या मेळाव्यात नाशिकमधील अनेक महिला कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला.

आपल्या भाषणात प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी महिलांच्या सामाजिक आणि राजकीय सहभागावर भर दिला. त्या म्हणाल्या की, महिलांनी केवळ सोहळ्यांपुरते मर्यादित न राहता आपल्या हक्कांसाठी संघटित व्हावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी महिलांची भूमिका निर्णायक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मेळाव्याला नाशिक शहर व जिल्ह्यातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेच्या ठिकाणी झालेली प्रचंड गर्दी आणि महिलांचा उत्साह पहायला मिळाला.


       
Tags: International Women's dayMaharashtranashikNashik newsPoliticalVanchit Bahujan AaghadivbaforindiaWomens day 2026
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्त्रिया

Next Post

कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

Next Post
कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

कुटुंबांचा “कर्जबाजारी”पणा:  महिला “बरेच” काही करू शकतात !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home