Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रेवस–रेड्डी मार्गावर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; वनरक्षक सुरज सारंगे यांचा दुर्दैवी मृत्यू 

mosami kewat by mosami kewat
March 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रेवस–रेड्डी मार्गावर खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळली; वनरक्षक सुरज सारंगे यांचा दुर्दैवी मृत्यू 
       
रायगड : रायगड जिल्ह्यातील रेवस-रेड्डी मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात अलिबाग वनविभागातील वनरक्षक सुरज सारंगे यांचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले होते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच काही तासांतच दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मुरूड तालुक्यातील सर्वे गावचे रहिवासी असलेले सुरज सारंगे हे अलिबाग वनविभागाच्या तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी (६ मार्च) रात्री उशिरा ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रेवस-रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदून ठेवलेल्या खोल मोरीत त्यांची दुचाकी अचानक कोसळली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शुक्रवारीच त्यांच्या जुळ्या बाळांना हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आले होते. कुटुंबात नव्या पाहुण्यांच्या आगमनाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच झालेल्या अपघाताने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले. सारंगे यांनी या आनंदाचा क्षण आपल्या मोबाईल स्टेटसवरही व्यक्त केला होता.

दरम्यान, रेवस-रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्या ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक, रेडियम पट्ट्या किंवा रात्री वाहनचालकांना दिसण्यासाठी लाल दिवे लावले नव्हते, अशी माहिती समोर येत आहे. या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात असून संबंधितांवर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे. कर्तव्यदक्ष वनरक्षकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वनविभागातही शोककळा पसरली आहे.

Tags: MaharashtraRaigadRaigad accident newsRaigad newsvbaforindia
Previous Post

देशासाठी २० वर्षे सेवा केलेल्या माजी सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळी जातीय भेदभाव ; कर्नाटकातील \चिन्नापूर गावात तणाव

Next Post

आज रंगणार टी-२० विश्वचषकाचा महामुकाबला ; भारत-न्यूझीलंड अंतिम फेरीत आमनेसामने

Next Post
आज रंगणार टी-२० विश्वचषकाचा महामुकाबला ; भारत-न्यूझीलंड अंतिम फेरीत आमनेसामने

आज रंगणार टी-२० विश्वचषकाचा महामुकाबला ; भारत-न्यूझीलंड अंतिम फेरीत आमनेसामने

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!
बातमी

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

by mosami kewat
July 10, 2026
0

पिंपरी-चिंचवड : "राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, विरोधी पक्ष सध्या मृत अवस्थेत आहे," अशा...

Read moreDetails
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

July 10, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 10, 2026
अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

July 10, 2026
अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

July 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home