Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

mosami kewat by mosami kewat
February 24, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

ट्रम्प-मोदी व्यापार युद्ध: बदललेले संदर्भ आणि भारतापुढील आव्हान

       

–संजीव चांदोरकर

ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये लावलेल्या आयात करात महत्वाचा फरक आहे !

आपले ऐकले नाही म्हणून दुसऱ्या देशावर मनमानी आयात कर लादण्याचे अस्त्र ट्रम्प यांच्याकडे नसेल. याचा फायदा मोदी राजवटीने घेऊन, सुरू असलेल्या व्यापार करारातील जाचक, विशेषतः शेतीक्षेत्राला, अटी राहणार नाहीत हे बघितले पाहिजे.

ट्रम्प यांनी एप्रिल २०२५ मध्ये विविध राष्ट्रांवर “रेसिप्रोकल” आयात कर लावले. ट्रम्प यांनी ते कर International Emergency Economic Power Act, (IEEPA), १९७७ कायद्याच्या आधारे लावले होते.

“रेसिप्रोकल” याचा अर्थ होता ज्या देशाचा जसा “गुन्हा” त्या प्रमाणात त्याला जास्त आयात कराची शिक्षा ! अर्थात गुन्हा कोणता , तो किती गंभीर हे आणि निकाल देणारी एकच व्यक्ती : डोनाल्ड ट्रम्प

चार दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने IEEPA कायद्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना असे आयात कर लावण्याचे प्रावधानच नसल्यामुळे ते लावलेले कर बेकायदेशीर आहेत असा निर्णय दिला.

लागलीच डोनाल्ड ट्रम्प यांनी USA Trade Act १९७४ मधील सेक्शन १२२ अंतर्गत अमेरिकेत येणाऱ्या आयातीवर आधी १० टक्के मग एका दिवसात वाढवून १५ टक्के आयात कर लागू होतील अशी घोषणा केली. या सेक्शन अंतर्गत, काँग्रेसने मंजुरी न दिल्यास, हे आयात कर फक्त १५० दिवस अमलात राहू शकतात.

काहीजण म्हणत आहेत की म्हणजे काहीच फरक झालेला नाही. वस्तुस्थिती वेगळी आहे.

IEEPA कायद्यांतर्गत लावलेले “रेसिप्रोकल” आयात कर हे देशनिहाय भिन्न होते. एखाद्या देशाला वठणीवर आणण्यासाठी महाकाय आयात कर लावून त्याचा अस्त्र म्हणून वापर ट्रम्प यांनी केला. त्याच देशांने गयावया करून ट्रम्प यांच्या पायाशी लोटांगण घातले तर तेच आयात कर ट्रम्प यांनी कमी देखील केले. ट्रम्प यांना व्यक्तिशः एकनिष्ठ राहणाऱ्या नेत्याच्या देशाला बक्षीस दिले जात होते. आयात कर लावताना त्यात अनेक बिगर व्यापारी निकष लावले गेले.

हे आयात कर राष्ट्राराष्ट्रात भेदाभेद करणारे होते. म्हणजे वस्तुमाल तोच पण कोणत्या राष्ट्राकडून निर्यात झाला यावरून अमेरिकेत लागणारे आयात कर ठरत होते.

USA Trade Act अंतर्गत आता लावलेले १५ टक्के आयात कर सरसकट सर्व देशांना समान असणार आहेत. भारतासकट अनेक देशांसाठी हा फरक महत्त्वाचा आहे.

अमेरिकेने लावलेले आयात कर हा महत्वाचा मुद्दा असला तरी त्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा असतो, तोच वस्तुमाल निर्यात करणाऱ्या माझ्या स्पर्धक देशासाठी माझ्यापेक्षा कमी का जास्त आयात कर लावले आहेत हा. कमी आयात कर असणाऱ्या देशाबरोबर स्पर्धा करणे त्यामुळे कठीण जाते.

दोन गोष्टी घडणार आहेत.

एक, सेक्शन १२२ अंतर्गत निर्यात करणाऱ्या देशांमध्ये आयात करासंबंधात असा भेदाभेद नाही. आणि दोन, आपले ऐकले नाही म्हणून शिक्षा म्हणून वाढीव आयात कर ट्रम्प आता लावू शकणार नाहीत.

(नवीन आयात कर धोरणात पोलाद, अल्युमिनियम आयातीला वेगळी ट्रीटमेंट सुरूच राहील. तसेच अनुचित व्यापार पद्धती वापरल्याचा आरोप असणाऱ्या चीनसाठी ३०१ अंतर्गत चौकशी आणि वेगळे आयात कर असतील. पण हा वेगळा मुद्दा आहे).

भारत अमेरिका मध्ये सहमती झालेला व्यापार करार अंतिम नाही तर एक इंटरिम फ्रेमवर्क आहे. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ट्रम्प प्रशासन कमकुवत झाले आहे. त्यामुळे अमेरिका भारत व्यापार कराराचे संदर्भ बदलले आहेत.

त्याचा फायदा भारताने उठवत नव्याने वाटाघाटी केल्या पाहिजेत. भारताच्या शेती क्षेत्रावर आघात होणार नाही हे बघितले पाहिजे. या संदर्भात भारत अमेरिकेत २३ फेब्रुवारी रोजी होणारी वाटाघाटांची फेरी पुढे ढकलण्यात आली आहे हे बरेच बोलके आहे.

देशाची जीडीपी कितव्या नंबरची हा दुय्यम मुद्दा. धैर्य कितव्या नंबरचे हा मुद्दा आहे. अमेरिकेचे सख्खे शेजारी असलेल्या कॅनडाच्या मार्क करनी यांनी ट्रम्प यांना हॅण्डल करताना धैर्य म्हणजे काय हे दाखवून दिले आहे.

नुसते शड्डू किती दिवस ठोकणार ? त्याला हिमत लागत नाही. आता ट्रम्प यांना ठोसा मारण्याची संधी मिळाली आहे. त्याला हिमत लागते.

(संदर्भ मनी कंट्रोल २३ फेब्रुवारी २०१६)


       
Tags: americablobaldonald trampnarendra modiShare marketTariffsTradeTrump–Modi Trade Tensions:
Previous Post

वंचित बहुजन आघाडी आणि वरळी बी.डी.डी. चाळ क्रमांक ८८, ८९ यांच्या आंदोलनाला मोठे यश!

Next Post

तिवसा नगरपंचायतवर वंचित बहुजन आघाडीची ‘धडक’; पाच दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Next Post
तिवसा नगरपंचायतवर वंचित बहुजन आघाडीची 'धडक'; पाच दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

तिवसा नगरपंचायतवर वंचित बहुजन आघाडीची 'धडक'; पाच दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home