Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

बीड जिल्ह्यातील सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उद्ध्वस्त, वंचितच्या ॲड. अरुण जाधव यांची घटनास्थळी भेट !

mosami kewat by mosami kewat
February 21, 2026
in Uncategorized
0
बीड जिल्ह्यातील सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उद्ध्वस्त, वंचितच्या ॲड. अरुण जाधव यांची घटनास्थळी भेट !
       
बीड (गेवराई तालुका): गेवराई तालुक्यातील सुर्डी गावात गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांवर १३ फेब्रुवारी रोजी गावातील काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान बालकांना बेदम मारहाण करण्यात आली असून, अनेक कुटुंबांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी केवळ घरे पाडून नुकसान केले नाही, तर घरातील संसारोपयोगी साहित्यही फोडून टाकले. शेतातील तब्बल सहा बोअरवेल दगडांनी भरून बुजवण्यात आल्याचा आरोप आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत मिळालेली घरकुलेदेखील जमीनदोस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या अमानुष मारहाणीत एका तरुण मुलीला गंभीर दुखापत झाली असून, ती सध्या बीड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून मृत्यूशी झुंज देत आहे. तसेच, पीडित कुटुंबांतील मुलांना शाळेत जाण्यास मज्जाव केला जात असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच शनिवारी (दि. २१) वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्यप्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह सुर्डी येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आदिवासी आणि पारधी समाजात संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबांना तातडीने संरक्षण व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

परभणीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; शेतकरी आणि प्रशासन आमनेसामने

Next Post

भारत टॅक्स देणार पण अमेरिका नाही : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी
बातमी

‘साहिल वाकोडेबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी मागा’; सुजात आंबेडकरांची IIT मुंबई प्रशासनाकडे मागणी

by mosami kewat
September 23, 2026
0

मुंबई : साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळावा, तसेच या प्रकरणात संस्थात्मक जबाबदारी निश्चित करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन...

Read moreDetails
बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

बिहारची ती घटना आणि ‘डब्ल्यूईएफ’चा अहवाल: एकाच नाण्याच्या दोन बाजू

September 23, 2026
मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक; भारताची २८ वर्षांची प्रतीक्षा संपली

September 23, 2026
मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा ‘नव्या नेतृत्वाचा संकल्प’ उपक्रम; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

September 23, 2026
पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

पुस्तक परीक्षण : आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे

September 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home