Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

mosami kewat by mosami kewat
February 12, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी: पिंपरी-चिंचवड ही महाराष्ट्राची औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते, पण या शहराच्या महत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या पिंपरी रेल्वे स्थानकाची अवस्था मात्र बिकट झाली आहे. रोज हजारो महिला प्रवासी येथून प्रवास करतात, मात्र त्यांना किमान मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.

पिंपरी रेल्वे स्थानकावरील महिलांचे स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. पुण्यात किंवा लोणावळ्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या हजारो महिलांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. प्रवास करताना स्वच्छतागृह बंद असणे ही महिलांसाठी मोठी समस्या आहे, अशी खंत महिला प्रवाशाने व्यक्त केली. सुरक्षेच्या बाबतीतही पिंपरी, चिंचवड आणि आकुर्डी स्थानके वाऱ्यावर आहेत. या ठिकाणी आरपीएफ (RPF) जवानांचा पत्ता नसून, भिक्षेकरी आणि मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्थानकातील बाकड्यांवर भिक्षेकऱ्यांनी ताबा मिळवल्याने प्रवाशांना गाडीची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागते.

मद्यपींच्या वाढत्या वावरामुळे महिला प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. तसेच स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचरा आणि राडारोडा पडलेला आहे. स्वच्छतागृहे बंद असल्याने अनेक जण उघड्यावर लघुशंका करतात, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छ भारत अभियानाचे इथे पूर्णपणे धिंडवडे निघताना दिसत आहेत. तहानलेल्या प्रवाशांना नळांना पाणी मिळेना. स्थानकात प्रवाशांसाठी चार ते पाच ठिकाणी नळ बसवण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे या नळांना पाणीच येत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांना खाजगी दुकानांवर अवलंबून राहावे लागत आहे. या सगळ्या समस्यांकडे प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Tags: PimpariPimpri ChinchwadPimpri Railway Station
Previous Post

मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Next Post

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 
बातमी

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले...

Read moreDetails
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home