लातूर : चाकूर तालुक्यातील जानवळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विनायक किशनराव बडे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
ही भव्य जाहीर सभा (दि. ३१) सायंकाळी ०६ वाजता चाकूर तालुक्यातील जानवळ येथे पार पडणार आहे. (Sujat ambedkar)
जानवळ जिल्हा परिषद गटात विनायक किशनराव बडे यांच्या उमेदवारीमुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर प्रस्थापितांना चांगलाच धक्का बसला आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्यासाठी सुजात आंबेडकर स्वतः मैदानात उतरणार आहेत. (Sujat ambedkar)
या सभेला चाकूर तालुक्यातील तसेच जानवळ गटातील बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.





