औरंगाबाद : भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनी आज औरंगाबादमध्ये एका धक्कादायक आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध नोंदवला.
नेमकी घटना काय?
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा दिवस सकाळपासूनच तणावपूर्ण राहिला. प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याचे आणि पैशांचे वाटप करून निवडणुका ‘मॅनेज’ केल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हणले आहे. या गैरप्रकार करणाऱ्या भाजप आमदार नारायण कुचे यांच्या प्रति नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. (Vanchit bahujan aghadi)

आंदोलकांनी ईव्हीएम मशिनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाहीची हत्या होत असल्याची घोषणाबाजी केली. तसेच
भाजप आमदारांनी पैशांच्या जोरावर निवडणूक यंत्रणा आणि निकाल प्रभावित केल्याचा ‘वंचित’कडून सांगण्यात आले. यावेळी संतप्त
नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून “पैशांच्या जोरावर लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींचा धिक्कार असो” अशा घोषणा देण्यात आले. औरंगाबाद येथे नागरिकांनी नारायण कुचे यांच्या पुतळ्याला भरचौकात फाशी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत निवडणुका पारदर्शक पद्धतीने होत नाहीत आणि बोगस मतदानाची चौकशी होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. (Vanchit bahujan aghadi)
काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती. यामध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबत चर्चा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला होता. ऑडिओमध्ये समोरची व्यक्ती आमदारांना सल्ला देताना म्हणते, “आता नको, थोडा अंधार पडू द्या, मग पैसे वाटप करू.”धक्कादायक बाब म्हणजे, “पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो,” असे उत्तर समोरच्या व्यक्तीने कुचेंना दिल्याचे या क्लिपमध्ये रेकॉर्ड झाले आहे.






