Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

mosami kewat by mosami kewat
January 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
       

औरंगाबाद : शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा धडाका लावला आहे. शहरातील ब्रीजवाडी भागात प्रभाग क्रमांक ९ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी करत वंचितला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

सभेला संबोधित करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी स्थानिक प्रशासनावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “शहराचा विकास केवळ कागदावर राहिला आहे. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही नागरिकांना संघर्ष करावा लागतोय. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने औरंगाबादचा कायापालट हवा असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.”

प्रभाग ९ चे अधिकृत उमेदवार सतीश पट्टेकर, शबनम कलीम कुरेशी, शहनाज सलीम पटेल आणि कलीम छोटू कुरेशी यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधतीताई शिरसाठ यांनीही यावेळी उपस्थितांमध्ये जोश भरला. “प्रस्थापित पक्षांनी केवळ आपली घरे भरली, पण वस्त्यांचा विकास केला नाही. आता वेळ आली आहे आपला हक्क मिळवण्याची. वंचितचे उमेदवार निवडून आले तरच सामान्यांचा आवाज महापालिकेत घुमेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

ब्रीजवाडीतील या सभेमुळे परिसरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. प्रभाग ९ मध्ये वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या या आघाडीमुळे सर्वत्र चर्चा होत आहे. 


       
Tags: Anjali AmbedkaraurangabadAurangabad municipal corporation election newsElectionElection campaignMaharashtraMunicipal corporation electionpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindiavote
Previous Post

मायानगर ते घाटकोपर… अंजलीताई आंबेडकरांचा उद्या मुंबईत सभेचा धडाका; कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह!

Next Post

लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर

लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते
बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

by mosami kewat
May 9, 2026
0

मुंबई: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन...

Read moreDetails
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

May 8, 2026
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home