कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली तयारी सुरू केली आहे. दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पॅनल क्रमांक १४ साठी तीन उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले.

विभाग क्रमांक १४ (अ) मधून सिंधु मेश्राम, विभाग क्रमांक १४ (क) मधून रुपेश हुंबरे तर प्रभाग क्रमांक १४ (ड) मधून शिंदे नितीन सुनील यांनी आपले अर्ज अधिकृतरीत्या दाखल केले.

या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत जनतेच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.





