जालना : आगामी जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात आघाडी घेत आपली पहिली अधिकृत उमेदवारी यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार, जालना शहरातील १९ प्रभागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या यादीमध्ये पक्षाने समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला असून, अनेक नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. जालना महानगरपालिकेत सत्तापरिवर्तन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली असल्याचे या यादीवरून दिसून येते.
जाहीर झालेल्या १९ उमेदवारांच्या नावांबाबत स्थानिक जिल्हा कार्यकारिणीने समाधान व्यक्त केले असून, लवकरच प्रचाराचा धडाका सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
जालना महानगरपालिका निवडणूक उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे –
– विकास शामराव मोरे, प्रभाग क्र. 1 अ, प्रवर्ग एस. सी
– मनोज हरिकिशन शर्मा, प्रभाग क्र. 2 ड, प्रवर्ग सर्वसाधारण
– निला गौतम काकडे, प्रभाग क्र. 4 अ, प्रवर्ग एस.सी महिला
– गौतम गंगाधर काकडे, प्रभाग क्र. 4 ड, प्रवर्ग सर्वसाधारण
– सुहासिनी पावलस कांबळे, प्रभाग क्र. 5 ब, प्रवर्ग ओबीसी महिला
– विनोद शामसन लोंढे, प्रभाग क्र. 5 ड, प्रवर्ग
सर्वसाधारण
– जहरा दिलावरखान, प्रभाग क्र. 10 ब, प्रवर्ग सर्वसाधारण महिला
– रुखसानाबी सय्यद काथोरोदिन, प्रभाग क्र. 10 क, प्रवर्ग सर्वसाधारण महिला
– अशोक शंकरराव रत्नपारखे, प्रभाग क्र. 12 अ, प्रवर्ग एस. सी
– मायाबाई अर्जुनराव वानखेडे, प्रभाग क्र. 13 ब, प्रवर्ग सर्वसाधारण महिला
– सत्यपाल शेषराव गायकवाड, प्रभाग क्र. 13 क, प्रवर्ग सर्वसाधारण
– विशाल काशिनाथ मगरे, प्रभाग क्र. 13 ड, प्रवर्ग सर्वसाधारण
– सरिता सचिन घोडे, प्रभाग क्र. 15 अ, प्रवर्ग एस.सी महिला
– संगीता विलास भिंगारे, प्रभाग क्र. 15 क, प्रवर्ग सर्वसाधारण महिला
– रंजीत विश्वनाथ रत्नपारखे, प्रभाग क्र. 15 ड, प्रवर्ग सर्वसाधारण
– अमोल विष्णू लोखंडे, प्रभाग क्र. 16 अ, प्रवर्ग एस. सी
– रमाबाई अरविंद होर्शील, प्रभाग क्र. 16 क, प्रवर्ग सर्वसाधारण महिला
– सुवर्णा गजानन कायंदे, प्रभाग क्र. 16 ब, प्रवर्ग ओबीसी महिला
– डॉ. दिपक शामराव भालेराव, प्रभाग क्र. 16 ड, प्रवर्ग सर्वसाधारण





