मुंबई : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस महायुतीच्या वतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
आज युतीच्या सहा प्रमुख उमेदवारांनी मोठ्या उत्साहात आणि समर्थकांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.या युतीमुळे अनेक प्रभागांमधील गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि श्रमिक बहुल पट्ट्यात या युतीने तरुण आणि अभ्यासू चेहऱ्यांना संधी दिली आहे.

आज खालील उमेदवारांनी आपापल्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अधिकृत रित्या अर्ज भरले:
वॉर्ड क्र. १९३: भूषण चंद्रशेखर नागवेकर
वॉर्ड क्र. १९४: शंकर (अशोक) व्यकटाद्री गुजेट्टी
वॉर्ड क्र. १९५: ओंमकार मोहन पवार
वॉर्ड क्र. १९६: ॲड. रचना अविनाश खुटे
वॉर्ड क्र. १९७: अस्मिता शांताराम डोळस
वॉर्ड क्र. १९९: नंदिनी गौतम जाधव
या युतीमुळे मुंबईतील मतदारांसमोर आता एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला असून, प्रस्थापित पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील काही दिवसांत उर्वरित वॉर्डांमधील उमेदवारांची नावे देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.






