अकोला : वंचित बहुजन आघाडीकडून नगरपंचायत निवडणुकीत बार्शीटाकळी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
अकोल्यातील ‘यशवंत भवन’ येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मूर्तिजापूरचे दोन अपक्ष नगरसेवक वंचित बहुजन आघाडीत दाखल; बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश!
नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर, बार्शी टाकळीच्या विकासाची धुरा आता या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे.
यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नगरसेवकाचा आणि नगराध्यक्षांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव केला






