औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, उमेदवारांच्या निवडीसाठी उद्या (दि. २३ डिसेंबर २०२५) भव्य मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबादमध्ये इच्छुकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
या मुलाखती राज्य कार्यकारिणी सदस्या तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाठ यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली पार पडतील.
उमेदवारांची गुणवत्ता आणि क्षमता तपासण्यासाठी अमित भुईगळ, प्रभाकर बकले आणि योगेश बन यांची समिती मुलाखती घेणार आहे.
या उमेदवारी मुलाखती वंचित बहुजन आघाडी, शहर-जिल्हा पक्ष कार्यालय, क्रांती चौक, औरंगाबाद वेळ सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी आणि वंचित-बहुजनांचा आवाज सभागृहात पोहोचवण्यासाठी जे कार्यकर्ते इच्छुक आहेत, त्यांनी आपले उमेदवारी अर्ज (फॉर्म) पूर्ण भरून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






