नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा
मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तसेच आजी – माजी पदाधिकारी आणि विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वांनी पुढाकार घेऊन केलेली मेहनत बहुप्रतिक्षित यशाचे कारण ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे यश सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून, निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.






