पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, वंचित बहुजन आघाडीने (VBA) पुण्यात आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी शेकडो इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जासाठी पक्ष कार्यालयात मोठी गर्दी केल्याने राजकीय वर्तुळात ‘वंचित’ची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद
उमेदवारी अर्ज घेण्यासाठी केवळ गर्दीच झाली नाही, तर आलेल्या इच्छुकांच्या प्राथमिक मुलाखतीही यावेळी पार पडल्या. पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष कार्यालय फुलून गेले होते. प्रस्थापित पक्षांसमोर वंचित बहुजन आघाडी पुण्यात मोठे आव्हान उभे करणार असल्याचे या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.

यावेळी निवड प्रक्रियेसाठी आणि इच्छुकांना मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने अनिता चव्हाण, उपाध्यक्ष गौतम ललकारे, दिपक ओवोळ, दिपक कदम, बी. पी. सावळे सर, नवनीत अहिरे, माणिक लोंढे, रिना वानखेडे, हनुमंत फडके यांसह अन्य मान्यवरांचा समावेश होता.

परिवर्तनासाठी इच्छुकांची ओढमुलाखती दरम्यान शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी सांगितले की, “पुणे शहरात वंचितांना न्याय देण्यासाठी आणि शहराचा समतोल विकास करण्यासाठी सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांची मोठी फळी तयार आहे. ही गर्दी परिवर्तनाची नांदी आहे.”






