Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कामातील विलंबाबाबत वंचित बहुजन आघाडीची तीव्र नाराजी

mosami kewat by mosami kewat
December 4, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कामातील विलंबाबाबत वंचित बहुजन आघाडीची तीव्र नाराजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कामातील विलंबाबाबत वंचित बहुजन आघाडीची तीव्र नाराजी

       

औरंगाबाद : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामातील विलंब लक्षात घेऊन आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद येथे भेट देण्यात आली. या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बैठक निश्चित करण्यात आली होती. मात्र ते कार्यालयात अनुपस्थित असल्याने चर्चा होऊ शकली नाही.

कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने पुतळा कामाच्या विलंबाबाबतचे निवेदन त्यांच्या कार्यालयाला चिटकवण्यात आले. त्याचबरोबर फोनद्वारे संपर्क साधून त्यांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले की – येणाऱ्या १ एप्रिल 2026 पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्यात येईल

यावेळी स्थानिक आमदार व खासदारांनी जनतेसमोर केलेले विधान—
“पुतळ्याचे काम आम्ही आमच्या वैयक्तिक किंवा विकास निधीतून करत आहोत” —
हे विधान संपूर्ण खोटे असल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले. प्रत्यक्षात हा प्रकल्प नगर विकास विभागाच्या निधीतून, औरंगाबाद महानगरपालिकेच्या अंतर्गत भरकलगेट परिसरात सुरू आहे.

कार्यकारी अभियंता यांच्या गैरहजेरीमुळे निवेदन स्वीकारले गेले नसले तरी, वंचित बहुजन युवा आघाडी औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष संदीप रतन जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन अधिकृत स्वरूपात कार्यालयाला देण्यात आले असून सरकारी यंत्रणेने तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली.


       
Tags: ###########MunicipalProjectaurangabadCivicIssuesDevelopmentDelayDrAmbedkarStatuePoliticalAccountabilityPublicProtestPublicWorksDepartmentPWDUrbanDevelopmentProjectVanchit Bahujan AghadivanchitbahujanaghadiYouthWingProtest
Previous Post

संतोष बांगर पुन्हा वादात; मतदान केंद्रात घुसून घोषणाबाजी, गोपनीयतेचा भंग केल्याने कारवाईची मागणी!

Next Post

तिवसा : शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी दिवसाच्या वेळीच कृषीपंप वीजपुरवठा सुरू करा – महावितरणला वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

Next Post
तिवसा : शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी दिवसाच्या वेळीच कृषीपंप वीजपुरवठा सुरू करा - महावितरणला वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

तिवसा : शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी दिवसाच्या वेळीच कृषीपंप वीजपुरवठा सुरू करा - महावितरणला वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!
बातमी

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

by mosami kewat
April 6, 2026
0

पनवेल : मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांवरील लाचलुचपत कारवायांची मालिका सुरूच असून रविवारी आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अर्थ व नियोजन...

Read moreDetails
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 5, 2026
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home