नाशिक : आगामी भगूर नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज वंचित बहुजन आघाडीने एका गंभीर प्रकरणाची तक्रार केली आहे. महायुतीच्या उमेदवारांकडून व सहभागी पक्षांकडून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या छायाचित्रांचा आणि पक्षाचानावाचा प्रचारात वापर केल्याचे समोर आल्याने वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठी चर्चा निर्माण झाली असून, मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. प्रचार साहित्यावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा फोटो आणि नाव उमेदवारांनी वापरल्यामुळे मतदारांना वंचित बहुजन आघाडी महायुतीसोबत असल्याचा भ्रम निर्माण होत असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे नाशिक तालुका महासचिव संतोष वाघ यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत संबंधित उमेदवार व पक्षांकडून केलेल्या प्रतीक, फोटो व नावाच्या गैरवापराबाबत कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
प्रमुख मुद्दे :
वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत पाठींबा नसताना प्रचारात नाव व फोटोचा वापर करत मतदार यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे.






