नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात इगतपुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प सभा संपन्न झाली.
“आपल्याला काम करायचे आहे त्यांच्यासाठी, ज्यांना आजपर्यंत सत्तेत जाण्यापासून रोखण्यात आले. प्रस्थापितांनी सत्तेची दारे बंद केली असली तरीही वंचितांना सत्तेत पोहोचवणे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निश्चितच सत्तेत जाणार असून, सत्तेत जाऊन गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या विकासासाठी काम करणार,” असे मत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, इगतपुरी व नाशिक येथील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






