मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या, मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील ऐतिहासिकछत्रपती शिवाजी पार्क येथे भव्य ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या महासभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून संविधानप्रेमी, लोकशाहीवादी आणि आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. शिवाजी पार्कात जनतेचा महासागर उसळणार असून, संविधान रक्षणाचा संकल्प पुन्हा एकदा बुलंद आवाजात दुमदुमणार आहे.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून सभेसाठी येणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी राज्य शासनाकडे महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.
सभेच्या निमित्ताने सर्व वाहनांना टोलमाफी द्यावी वंचित बहुजन आघाडीची मागणी –
संविधानाच्या गौरवासाठी आयोजित या महासभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो वाहने येणार असल्याने, सर्वसामान्य नागरिकांवरचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाळण्यासाठी सभेत ये-जा करणाऱ्या सर्व वाहनांना टोल पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.
विशेषतः खालील महत्त्वाच्या टोल नाक्यांवर माफक नसून संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला आहेसोमाटणे टोल नाकाउर्से टोल नाकावरसोली टोल नाकाया मार्गांवरून मुंबईत येणाऱ्या हजारो वाहनांना टोलमाफी दिल्यास येणाऱ्या जनतेला दिलासा मिळेल. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाही मूल्यांचा सन्मान अधिक भव्य पद्धतीने होईल, असे वंचित बहुजन आघाडीकडून नमूद करण्यात आले आहे.






