ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात मुंबईत होणार संविधान सन्मान महासभा
अकोला : मुंबई येथे 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या संविधान सन्मान महासभा संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक सर्किट हाऊस अकोला येथे घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे होते, तर जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार दामोदर यांनी केले आणि प्रास्ताविक कोषाध्यक्ष दादाराव पवार यांनी केले. तालुका व शहर पातळीवरील युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. मुंबईतील महासभेसाठी अकोला जिल्ह्यातून अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे, याबाबत सूचना देण्यात आल्या. तालुका व शहराध्यक्षांनी आपल्या स्तरावर युवकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहील अशी हमी दिली.
मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’च्या पोस्टर्सने वेधले लक्ष; दादर मध्ये मोठे बॅनर्स
बैठकीस संतोष वनवे, कृष्णा देवकुणबी, स्वप्नील आखरे, निलेश इंगळे, मीनल मेंढे, नितीन वानखडे, अक्षय राऊत, आशिष रायबोले, मिलिंद दामोदर, सम्राट तायडे, अमन गवई, अमोल वानखडे, शुभम साऊतकर, रणजीत शिरसाट, महेंद्र तायडे, ऋषिकेश तोरणे, लखन चव्हाण, सचिन सरकटे, स्वप्निल वानखडे, प्रदीप इंगळे, जय रामा तायडे, आकाश गवई, सुरज दामोदर, आकाश जंजाळ, आनंद शिरसाट, नम्रता आठवले, राजेश बोदडे, यश तुरेराव आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार नागेश उमाळे यांनी मानले. बैठकीला युवक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






