पुणे: बांधकाम कामगार आणि श्रमिकांना संघटित करणारी महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या बांधकाम कामगार श्रमिक सेना (महाराष्ट्र राज्य) या संघटनेने वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते दिपक राजू म्हेत्रे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये झाला.
कामगार नेते दिपक राजू म्हेत्रे यांच्या संघटनेची पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल पाच लाख सभासद नोंदणी आहे. या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची पुणे जिल्ह्यातील ताकद वाढली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव आणि पिंपरी चिंचवड शहरचे युवक अध्यक्ष विनोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.





