पैठण : आगामी पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) जोरदार तयारी सुरू केली आहे. दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पक्षाच्या दोन उमेदवारांनी पैठण नगरपरिषदेच्या दोन महत्त्वाच्या प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, तहसील कार्यालय पैठण येथे आपले नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल केले.
प्रभागातून उमेदवारांनी भरले अर्ज
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (औरंगाबाद पूर्व) ऍड. रामेश्वर बापू तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
प्रभाग क्र. ४: सुनिता बाबासाहेब चाबुकस्वार
प्रभाग क्र. १०: विष्णू गोविंद वीर
या दोन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत पैठण नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष ऍड. रामेश्वर बापू तायडे यांनी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसाठी पोषक व अनुकूल वातावरण असल्याचे नमूद केले. “औरंगाबाद (पूर्व) जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईत बौद्ध समाज संवाद दौरा संपन्न: वंचित बहुजन आघाडीकडून ‘संविधान सम्मान महासभे’चे निमंत्रण
तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांनी यावेळी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पैठण शहरातील मतदारांना विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलेल्या भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाची विकासकामे याची जाणीव झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी पॅठण शहरातील नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन मैदानात उतरली आहे, ज्यात: स्वच्छता आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न, अंडरग्राउंड गटार योजना, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, शहराचा सर्वांगीण विकास (आरोग्य, शिक्षण, स्वच्छता), रोजगार आणि तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन, या मूलभूत प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी पक्ष काम करणार असल्याचे निकाळजे यांनी सांगितले.
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जि. महासचिव रामदास वाघमारे, जि. उपाध्यक्ष मुंजाभाऊ तूपसमिदिरे, जि. संघटक भगवानराव बनसोडे, शहराध्यक्ष अनिल शेवाळे, अभिजीत पा. पवार, अविनाश चाबुकस्वार, आयुब शेख, प्रदीप गायकवाड, गोरख दाभाडे, बाळू सदावर्ते, शिला वीर, प्रशांत चव्हाण, पंकज गायकवाड, विशाल कोल्हे, गौतम खरात, जाकीर शेख तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि युवक सहभागी झाले होते.





