Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर

mosami kewat by mosami kewat
November 18, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर
       
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी, BARTI) संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुलाखत परीक्षा (Civil Services – Personality Test Examination) 2025 साठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत, मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक उमेदवारास रक्कम रु. २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) चे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) नुकताच दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल (Main Examination Result) घोषित केला आहे. या निकालानुसार, जे उमेदवार आता मुलाखत परीक्षेसाठी (Personality Test Examination) पात्र ठरले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

लाभ घेण्यासाठी आवाहनसदर योजनेची सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचा फॉर्म बार्टी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी राज्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बार्टीच्या संकेतस्थळावरील खालील लिंकला भेट द्यावी:

येथे क्लिक करा

Tags: BARTIEducationstudentUpscVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

निवडणूक रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचा ‘ईश्वर चिठ्ठी’ पॅटर्न!

Next Post

पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल

Next Post
पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल

पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द! 
बातमी

वंचित आक्रमक : नांदेडमध्ये आरएसएसप्रणीत संघटनेच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा कडाडून विरोध; पीपल्स कॉलेजमधील कार्यक्रम अखेर रद्द! 

by mosami kewat
March 19, 2026
0

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पीपल्स कॉलेजमध्ये १८ मार्च २०२६ रोजी आरएसएसकडून आयोजित करण्यात आलेला महिला दिनाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या...

Read moreDetails
धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

धार्मिक स्वातंत्र्यावर गंभीर आरोप; RSS शी संबंधित व्यक्तींवर मालमत्ता जप्ती व अमेरिकेत प्रवेशबंदीची शिफारस

March 18, 2026
दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्ली हादरली! पालम येथील इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू

March 18, 2026
बँकांचे लाखो कोटी रुपये 'विल्फुल डिफॉल्टर्स'च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

बँकांचे लाखो कोटी रुपये ‘विल्फुल डिफॉल्टर्स’च्या घशात; सामान्य नागरिक मात्र मूक प्रेक्षक!

March 18, 2026
अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट तलाव कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

March 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home