नवी दिल्ली: बांगलादेशात २०२४ साली हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनानंतर बांगलादेशचे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण कोर्टाने शेख हसीना यांना हा निर्णय घेत फाशीची शिक्षा घोषित केली.
बांग्लादेशात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्या तसेच ५ वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे केल्याचा आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आले होते. या प्रकरणात, तीन सदस्यांच्या समितीनं एकमताने या निर्णयासाठी सहमती दर्शवली आणि कोर्टानं अंतिम निकाल दिला. हा निकाल 453 पानांचा आहे. हे प्रकरण सर्वात मोठं असून 6 टप्प्यात या प्रकरणाचा निकाल देण्यात आला.
शेख हसीना यांच्यावर करण्यात आलेले आरोप –
२०२४ साल च्या आंदोलनात १४०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. शेख हसीना यांनी सरकार टिकून राहण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर हल्ला घडवून आणला. UN च्या मानवाधिकार तपासकर्त्यांचं म्हणणं होतं. तसेच त्यांनी बांगलादेश सोडण्यापूर्वी करणाऱ्यांवर गोळीबार करण्याची आदेश दिला. असा आरोप करण्यात आले.
मात्र यापूर्वी देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आले असून त्यांनी ते नाकारले. शेख हसीना इतक्यावरच थांबल्या नाही तर, शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर हेलिकॉप्टरने बॉम्ब टाकण्याचे आदेश दिले होते. हा सुनियोजित हल्ला होता हे कोर्टात सिद्ध झाल्यानंतर आता कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा दिली आहे.






