मुंबई : भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील अणुशक्ती नगर, गौतम नगर आणि सह्याद्री नगर येथे नुकताच ‘बौद्ध समाज संवाद दौरा’ यशस्वीरीत्या संपन्न झाला.
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बौद्धांच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक बाबींवर सामूहिक निर्णय घेण्यासाठी हा संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील सर्व बौद्ध समूहांशी चर्चा करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.
पालघरमधील साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपमध्ये!
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी बौद्ध अनुयायांशी सखोल संवाद साधला. त्यांनी बौद्धांसमोरील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक आव्हाने आणि त्यावरचे प्रभावी उपाय यावर प्रश्नोत्तरे चर्चा करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संविधान सम्मान महासभेचे निमंत्रण
संवाद दौऱ्यादरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सम्मान महासभे’ चे निमंत्रणही बौद्ध अनुयायांना देण्यात आले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महासचिव सतीश राजगुरू यांच्यासह अणुशक्ती नगर परिसरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





