Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

पालघरमधील साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपमध्ये!

mosami kewat by mosami kewat
November 17, 2025
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
पालघरमधील साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपमध्ये!

पालघरमधील साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपमध्ये!

पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर भाजपने तीव्र आरोप केले होते, त्याच काशिनाथ चौधरीला रविवारी स्थानिक नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

ज्या नेत्यावर गंभीर आरोप करून धुमाकूळ माजवला होता, तोच नेता आता पक्षाच्या व्यासपीठावर उभा आहे. या सर्व प्रकारावर
भाजपने केलेल्या आरोपांचे काय झाले? असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काशिनाथ चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते आहेत. यांच्यावर भाजपने गडचिंचले साधू हत्या प्रकरणात ‘मुख्य आरोपी’ असल्याचा आरोप केले होते. तसेच या प्रकरणात तत्कालीन ठाकरे सरकारला घेरले होते.

बिहार निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य; काँग्रेसने दलित आणि हिंदू मतदारांचा विश्वास गमावला!

एकनाथ शिंदे यांनी तर बंडखोरीच्या कारणांपैकी साधू हत्याकांड हे एक कारण सांगून, “साधूंची हत्या आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो,” असे विधान केले होते. सद्यस्थिती: ज्यांच्यावर हे सर्व आरोप झाले, तेच काशिनाथ चौधरी आता डहाणू येथे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आता त्या आरोपाचे काय?

चौधरी यांच्यासोबत ३ हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, पालघरच्या राजकारणात हा मोठा भूकंप मानला जात आहे.

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने आता कोणत्या तोंडाने गडचिंचले प्रकरणावर बोलावे? त्यांचे ते ‘तीव्र’ आरोप, ती ‘न्यायाची’ मागणी आता विरून गेली की काय? “राजकीय सोयीसाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते, हेच या प्रवेशातून सिद्ध झाले आहे.

पालघर साधू हत्या प्रकरण नेमके काय ?

१६ एप्रिलच्या 2022 रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. या प्रकरणात १०८ साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेला.

Tags: BJPControversyBJPEntryRowElectionTwistKashinathChaudharymaharashtrapoliticsPoliticalPoliticalHypocrisyPoliticalSwitch
Previous Post

युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

Next Post

मुंबईत बौद्ध समाज संवाद दौरा संपन्न: वंचित बहुजन आघाडीकडून ‘संविधान सम्मान महासभे’चे निमंत्रण

Next Post
मुंबईत बौद्ध समाज संवाद दौरा संपन्न: वंचित बहुजन आघाडीकडून 'संविधान सम्मान महासभे'चे निमंत्रण

मुंबईत बौद्ध समाज संवाद दौरा संपन्न: वंचित बहुजन आघाडीकडून 'संविधान सम्मान महासभे'चे निमंत्रण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…
बातमी

सोशल मीडियाच्या पलीकडचा संघर्ष: देशातील तरुण रस्त्यावर उतरतो तेव्हा…

by mosami kewat
July 21, 2026
0

- संजीव चांदोरकर  देशातील सर्व विद्यार्थी तरुणांचे अभिनंदन आणि आभार !  …..  देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय,  गेली अनेक वर्ष...

Read moreDetails
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

July 21, 2026
२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

२२ बलिदाने जाऊनही सत्ताधारी अन् विरोधक गप्प का? NEET पेपरफुटीवरून अहिल्यानगरात ‘संघर्ष मार्च’चा जोरदार एल्गार!

July 21, 2026
आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी; नगरसेवक निलेश देव यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन यशस्वी स्थगित

July 21, 2026
SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home