Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

mosami kewat by mosami kewat
November 10, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

       

“पुन्हा भ्रष्टाचार करू नका” तंबी देत शिस्तीत राहण्याचा बांधकाम विभागाला इशारा

अकोला : जिल्हा परिषद मधील मॅनेज काम वाटप सभेवर वंचित युवा आघाडीने आक्षेप घेऊन कार्यकारी अभियंत्यास काळे फासण्यासाठी जाताच युवा आघाडीच्या दणक्याने ४ नोव्हेंबरची जिल्हा परिषदेचे काम वाटप सभा रद्द करण्यात आली. जिल्हा परिषद मध्ये कामकाज करताना “पुन्हा भ्रष्टाचार करू नका” अशी तंबी देणारी ओळ कार्यकारी अभियंता यांच्या पाठीमागे लिहून शिस्तीत राहण्याचा बांधकाम विभागाला इशारा देण्यात आला.

अकोला जिल्हा परिषदेच्या काम वाटप सभेत केवळ २२ कामे दाखवून २०० पेक्षा अधिक ८ कोटीची कामे नियमबाह्य मंजूर करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यावर जिल्हा परिषद मधली कमिशनखोरी बंद करा अन्यथा कार्यकारी अभियंता पी पी इंगळे ह्यांना सोमवारी काळे फासण्याचा इशारा वंचित युवा आघाडीने दिला होता. मात्र तीच सभा रेटून नेण्याचा प्रयत्न बांधकाम विभागाने चालवला होता. काळे फासण्याचे अंमलबजावणीसाठी युवा आघाडी पदाधिकारी एशियन चा काळा पेंट घेऊन कार्यकारी भियंत्याच्या दालनात पोहोचले आणि दोन ठिय्या आंदोलन करण्यात आले.

त्यावर कार्यकरी अभियंता यांनी कामवाटप समिती प्रक्रिया रद्द करण्यास टाळाटाळ करीत असल्याने युवा आघाडीने त्यांना आधी उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घेऊन गेले.

परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकारी बचावची भूमिका घेतल्याने युवा आघाडीचे आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चेंबरमधून बहिर्गमन करून कार्यकारी अभियंता चेंबर मध्ये प्रवेश करत पुन्हा ठिय्या सुरू केला. पत्र मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार युवा आघाडी पदाधिकारी यांनी केला होता. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिस बोलवत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक तास ठिय्या आंदोलन सुरू होते.

अखेर जिल्हा परिषद प्रशासन ताळ्यावर आले आणि अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांचे पत्र आणि वंचित बहुजन युवा आघाडी मोर्चा यामुळे दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ ची काम वाटप सभा रद्द करण्यात आल्याचे पत्र कार्यकारी अभियंता यांनी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांना देण्यात आले. त्यानंतर कार्यकारी अभियंता ह्यांचे चेंबर मध्ये “पुन्हा भ्रष्टाचार करू नका” असे प्रदेश महासचिव यांनी कार्यालयाच्या भिंतीवर लिहीत समज दिली. युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे पाटील आणि जिल्हा युवा महासचिव राजकुमार दामोदर यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनात युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्षश्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष वैभव खडसे, मिलिंद दामोदर,आशिष रायबोले, सम्राट तायडे,सुगत डोंगरे, माजी जि प सदस्य गोपाल कोल्हे,सचिन शिराळे, जय तायडे, नागेश उमाळे, सुरेंद्र तेलगोटे, नितीन वानखडे,राजदार खान, अमोल वानखडे, श्रीकृष्ण देवकुणबी, सुमेध खंडारे, पुरुषोत्तम अहिर, माजी. जि. प. सदस्य योगेश वडाळ,अमन गवई,समीर पठाण,उमेश लबडे, महेंद्र शिरसाट,आकाश गवई, आकाश जंजाळ, सचिन सरकटे, श्याम काळे, प्रदिप इंगळे, विश्वा खंडारे, अभी अवचार,अतिश अवचार, अमोल डोंगरे, सचिन सरकटे युवा आघाडी पदाधिकारी सहभागी झाले होते.


       
Tags: AkolaAkolaZPProtestMaharashtraSocialJusticeMovementStopCorruptionVanchit Bahujan AghadivbaforindiaYouthPower
Previous Post

धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

Next Post

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!

Next Post
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!
बातमी

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!

by mosami kewat
November 10, 2025
0

देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांच्या संविधानाने चालेल! मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक...

Read moreDetails
Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

November 10, 2025
धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

धाराशिव शहरातून वंचित बहुजन आघाडीला नवे बळ ; भीम आर्मीचे नेते भैय्यासाहेब नागटिळे वंचितमध्ये !

November 10, 2025
'साडी'वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार

‘साडी’वर निषेध! डॉ. संपदा मुंडे प्रकरणावरून अकोल्यात वंचित महिला आघाडीचा रुपाली चाकणकरांविरोधात एल्गार

November 10, 2025
कोल्हापूरमध्ये राजकीय मनोमिलन: भाजपसोबत असूनही अजित पवार गटाची, शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी 'युती'

कोल्हापूरमध्ये राजकीय मनोमिलन: भाजपसोबत असूनही अजित पवार गटाची, शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी ‘युती’

November 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home