ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात पार पडणार संविधान सन्मान सभा
मुंबई : शिवाजी पार्क, दादर येथे २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती.
त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा सज्ज होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही महासभा यंदा आणखी भव्य, प्रभावी आणि ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
या सभेत संविधानाच्या रक्षणाचा निर्धार, मनुवादाविरोधातील भूमिका आणि लोकशाही मूल्यांचे पुनरुज्जीवन याची चर्चा केली जाणार आहे. देशभरातून लाखो कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या मुंबईकडे रवाना होणार आहेत.






