मुंबई : काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशातील एका सरकारी शाळेत ८ वर्षांच्या दलित विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांकडून दीर्घकाळ आणि वारंवार शारीरिक व जातीय छळ (Caste Atrocity) सहन करावा लागल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे आणि देशातील राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे
मारहाणीचे स्वरूप इतके क्रूर होते की विद्यार्थ्याच्या कानातून रक्त आले. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, जबरदस्तीने कपडे काढून, आरोपींनी विद्यार्थ्याच्या पॅन्टमध्ये विंचू ठेवला. तसेच ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले की, याच शाळेत नेपाळी आणि दलित विद्यार्थ्यांना उच्च जातीच्या विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जाते.
पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न
भाजप-काँग्रेसवर तीव्र टीका
या घटनेच्या निमित्ताने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांवर सडकून टीका केली आहे.
“भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळे मुखवटे घालतात, पण जातीय व्यवस्थेचीच सेवा करतात. मतांसाठी आणि केवळ दाखवण्यासाठी दलितांच्या सन्मानाचा व्यापार करतात,” असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात, “ते एकमेकांच्या विरोधात ओरडतात, पण दलित अत्याचारातील त्यांची मिलीभगत तीच आहे. दलितांसाठी सत्ताधीश बदलतात, पण वेदना कायम राहते.”
या गंभीर घटनेनंतर त्यांनी दलितांना बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला नवा मार्ग स्वीकारण्याचे आणि राजकीय पर्याय निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “दलित कधी उठून बाबासाहेबांनी पाहिलेला नवा मार्ग निवडतील – एक पर्याय निर्माण करतील?”





