मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागाठाणे वाडा क्र. १४ येथे बोरिवली ते ठाणे भुयारी मार्ग प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, पुनर्वसनाची अडचण, तसेच प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी राजा भालेकर (मुंबई प्रदेश महासचिव), आशा मगर (मुंबई प्रदेश सदस्य), रौनक जाधव (मुंबई प्रदेश युवक महासचिव), विशाल पवार (मुंबई प्रदेश सदस्य), दिपक हनवंते (मुंबई प्रदेश सदस्य), पत्रकार विजय लांडगे (मा. उत्तर मुंबई जिल्हा सचिव), अंकुश जाधव (समन्वयक), मुकेश वाकळे सर (समन्वयक), तसेच मंगेश म्हस्के, पायके, लांडगे, डोळस, रंजनिकांत, लगाडे आणि संबंधित विभागातील बाधीत जनता व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीजेपी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
या बैठकीचे आयोजन चेतन गायकवाड, प्रभाग समन्वयक, वॉर्ड क्रमांक 26 (वंचित बहुजन आघाडी) यांनी केले. बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य पुनर्वसनासाठी पुढील पावले उचलण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.






