– राजेंद्र पातोडे
२ नोव्हेंबर २०२५, नवी मुंबई।
भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून पहिल्यांदाच महिला विश्वचषक उंचावला. स्टेडियममध्ये ३४,००० प्रेक्षकांचा गजर, मैदानावर हरमनप्रीत, शेफाली, दीप्ती, ऋचा यांची फटकेबाजी, गोलंदाजी ह्यात सामूहिक खेळाचे प्रदर्शन करीत महिला संघ विजेता बनला.
आणि तरीही सोशल मीडियावर ट्रेंडिंग राहिली फक्त #जेमिमारॉड्रिग्ज.
कारण? ती फक्त २४ धावा करून आऊट झाली होती. ट्रोलिंगचे कारण होते तिने सेमी-फायनलमध्ये दबावात केलेल्या विश्वविक्रमी खेळीनंतर जीससला ‘थँक्स’ म्हटले होते.
ट्रोल्सची टॉप-हिटलिस्ट पहा (कमेंट)
१. “Jesus on Sunday holiday tha kya?”
२. “127 के बाद Jesus, 24 पे Jesus gayab!”
३. “Ricebag! Convert mar kar!”
४. “Khar Gymkhana ने membership cancel ki thi na? Ab World Cup bhi cancel kar do!”
५. “Shafali ne 87 maari, usne Mahadev को thank you nhi bola… secular hai na?”
अश्या वाह्यात पोस्ट आणि कमेंट होत्या. त्यातील बहुतेक फेक अकाउंट आहेत, जे सत्ताधाऱ्यांसाठी ट्रोलिंग गँग म्हणून काम करतात किंवा त्यांची कट्टरता पसरवणे ही राष्ट्रभक्ती समजून द्वेष पसरवतात. म्हणूनच #X (पूर्वीचे ट्विटर) वर #JemimahRodrigues या हॅशटॅगखाली २४ तासांत ८०,०००+ पोस्ट्स येतात. ९० टक्के ट्रोल्स एकाच टेम्प्लेटचे आहेत. सेमी-फायनलमधला ‘जीसस-थँक्स’ आणि फायनलमधला ‘फ्लॉप’ ही एखाद्या खेळाडूला ख्रिश्चन असल्याची शिक्षा देणारे आहे. महिला खेळाडूंनी मनुवादाला पराभूत करून हा चषक जिंकला, त्यामुळे हे मनुवादी पिसाळले आहेत.
जेमिमाने फायनलमध्ये केलेल्या धावांबद्दल ट्रोलर्स अत्यंत घाणेरड्या कमेंट्स करून आपली भिकार मानसिकता दाखवत आहेत.
ह्या ट्रोलिंगचं डबल स्टँडर्ड पहा:
- जेव्हा मनु भाकर ऑलिम्पिक मेडल जिंकते, तेव्हा तिने गीतेमधली ओळ म्हटल्यास त्यावर पायघड्या घालतात.
- सूर्यकुमार यादव T20 WC जिंकतो आणि मोदींना थँक्स म्हणतो, तेव्हा ट्रोलर्स त्यावर ‘जय हो’ म्हणतात.
- आणि जेमिमा जीससला थँक्स म्हणते, तेव्हा ती अँटी-नॅशनल! देशद्रोही ठरवली जाते!
म्हणजे धर्म हा खाजगी असेल हा नियम फक्त ख्रिश्चन-मुस्लिम खेळाडूंसाठी आहे का? हा खेळ नाही, तर हा हिंदू-ख्रिश्चन द्वेषाचा विखार आहे. त्यातून २०२५ मध्ये विश्वचषक फायनलसाठी पुन्हा घाण पसरवली जात आहे. ट्रोलर्सना भारताच्या विजयापेक्षा जेमिमाचं अपयश जास्त महत्त्वाचे वाटते. म्हणूनच X वर एकाने लिहिलं: “India हार जाती toh Jesus को blame करते!” म्हणजे देशाच्या पराभवाची कामना ठेवून फक्त एका ख्रिश्चन खेळाडूला ट्रोल करण्यासाठी हत्यार म्हणून वापरले जाणार आहे.
जेमिमानं तमाम भारतीयांना काय शिकवलं?
मेंटल हेल्थ – “गेल्या ४ महिने रोज रडले, अॅंग्झायटी होती.”
टीम फर्स्ट – “मला सेंच्युरी नाही, भारताला फायनल हवी होती.”
तिच्या १२७ धावांनी संघ फायनलमध्ये गेला, तरी ट्रोलर्सना फक्त तिच्या २४ धावा दिसल्या, कारण ती त्यांच्या धर्माची नाही. त्यांचा स्कोरकार्ड धर्माचा आहे, रनचा नाही.
शेवटचा प्रश्न असा आहे की:
जर जेमिमा जय श्रीराम म्हणाली असती तर? हेच ट्रोलर्स तिला “True Indian! Sanskaari beti!” म्हणून डोक्यावर घेऊन नाचले असते. २०१४ पासून देशात धर्म आणि जातीचा विखार निर्माण करण्यासाठी संघ आणि भाजपमुळे मुक्त परवाने मिळाले, त्याची फळे देशाला कमकुवत करीत आहेत.
जेमिमा, तू विश्वचॅम्पियन आहेस. तू मैदानात लढली म्हणून संघ अंतिम फेरीत होता. #ThankyouJemimah
तुझ्या खांद्यावर विश्वचषक असून तू भारताची शान आहेस.






